अजूनपर्यंत तरी आई बाबांनी लग्न न करून दिल्यामुळे भटक्याची भ्रमंती सुरूच आहे... बायको आल्यावर बायकोबरोबर सुरु होईल एवढाच फरक पडेल कदाचित. खूप वर्ष डहाणुला होतो, कधी ट्रीप ला वैगरे जायची गरजच पडली नाही, आणि तसा ग्रुप पण नव्हता. पण सध्या जिथे नोकरीला आहे तिथे चान हौशी मित्र मैत्रिणी भेटलेत.. त्यानाही फिरायला खूप आवडत. छान ग्रुप जमला. हळू हळू एकेकाच लग्न होत गेल काहीना मुल झाली आणि ग्रुप वाढला.... आता यापुढे जिथे जिथे जाऊन आलोय त्या आठवणी लिहून काढणार आहे..... पुन्हा स्वान्तसुखाय...